Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

आर्यांची राज्यव्यवस्था.

 अशा प्रकारें पृथक् पृथक् वांटलेली शक्ति एकवट करून, जी प्रजेनें अत्युदार बुद्धीनें अधिकार समुच्चय व राजास दिली, तिलाच आपण अधिकारसमुच्चय अशी संज्ञा देऊ. हा अधिकारसमुच्चय प्रजेच्या मोठ्या प्रीतीची व जिवाची अमुल्य ठेव होय. आणि ह्मणूनच ह्या ठेवीचें योग्य संगोपन, राजानें फार काळजीपूर्वक व विश्वासाने, अवश्य केले पाहिजे.
 प्रजा ही राजाला पितृवत् मानीत असल्या कारणानें, राजानें तिचें पुत्रवत् पालन केलें पाहिजे. तिच्या ज्या ज्या गरजा असतील त्या त्या त्यानें भागविल्या पाहिजेत; तिच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत; तिच्या दुःखाचें उपशमन केले पाहिजे; आणि तिच्या सुखोपभोगाकडे सर्व प्रकारें त्यानें चांगलें लक्ष्य पूरविलें पाहिजे.
प्रजाजनाचा अधिकार केवढा प्रचंड आहे, व लोक- लोकमत. मताला मान देऊन, त्याचा आदर- पूर्वक कसा स्वीकार केला पाहिजे, याविषयी फारच मार्मिक विवेचन आंग्ल देशांतील सुप्र- सिद्ध वक्ता बर्क यानें केलें आहे. तो असें ह्मणतो की:-
“The people are the masters. They have only to express their wants at large and in gross. We are the expert artists; we are the skilful workmen, to shape their desires into perfect form, and to fit the utensil to the use. They are the sufferers, they