Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ भाग

भारतीय साम्राज्य.

अधिकाराचा चांगला उपयोग करून, प्रजाजनाचे सर्व- प्रकारें पालन करील व त्यांचें वात्सल्य संपादील, असा हेतु मनांत धरूनच आपले एकवट झालेले हक्क प्रजाही मोठ्या प्रेमभावानें व आदरपूर्वक राजाला देत असते. आणि अशा हक्कांचा सदुपयोग करणें, हेंच राजाचे पहिलें कर्तव्यकर्म होय.
प्रजा प्रभुत्वाचें पृ- थक्करण. "राजा बोले आणि दळ हलें" ह्मणून जी आप- ल्यांत ह्मण आहे, ती राजाच्या शक्तीची द्योतक होय. पण ही शक्ति, व अशा प्रकारचे कर्तुम्, अकर्तुम्, अन्यथा कर्तुम्, इत्यादि प्रचंड सामर्थ्य, मूळचें राजाचे नव्हें. तें निःसंशय लोकसंघाचे एकवटलेलें तेज होय. हैं जितक्या प्रमाणानें पृथक् पृथक् वास करितें, तितक्याच प्रमाणानें त्याचें सामर्थ्य अगदीं संकुचित असतें. किंबहुना, तें बिलकुल नसतंच, असें देखील ह्मणण्यास कांही हरकत नाहीं. ज्याप्रमाणे, प्रत्येक किरणाचें निराळे झालेलें तेज बिलकुल दाहक किंवा दीप्तिमय नसून, फक्त एकत्र झालेलीं किरणेंच सूर्याप्रमाणें तेजःपुंज भासतात; त्याप्रमा- माणेच, प्रजेची प्रत्येक व्यक्ति पृथक् पृथक् घेतली तर, त्या निरनिराळ्या झालेल्या व्यक्तीचा यत्किंचितही प्रभाव भासमान होत नसून, त्याच व्यक्तीची एकरूपता होतां क्षणींच, त्यांची शक्ति आपोआपच दिसूं लागते.