पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १२. आर्यभाषा. ह्या भूमंडलावर जितक्या ह्मणून मानवी भाषा आप- णास माहीत आहेत, त्या सर्वोत संस्कृत ही आदिभाषा असून, गुणो- त्कर्ष व श्रेष्ठता यासंबंधाने तिला पहिल्या पंक्तीलाच बसविले पाहिजे. तिची रचना विल- क्षण आणि अलौकिक आहे, असे कोणालाही कबूल करणें भाग आहे. इतकेंच नाहीं तर, उदात्तता, प्रसाद, पदलालित्य, इत्यादि गुणांत तिची बरोबरी कोणतीही भाषा करूं शकणार नाही. तिच्यांत गांभीर्य असून माधुर्य आहे, अर्थव्यंजकता असून प्रौढता आहे, व मार्दव असून चारुता आहे. इतर भाषांशी तिची तुलना करून पाहतां पूर्णत्व आणि अर्थगौरव, यासंबंधानें ती ग्रीक भाषेपेक्षांही विशेष श्रेष्ठतर पदवीस पोहोंचली आहे. इतकेच नाही तर, अर्थबाहुल्याविषयी विचार करतांना, लाटिन् भाषेपेक्षां देखील तिर्चे महत्व जास्त ७ संस्कृत भाषा व तिचें श्रेष्ठत्व.