पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ठरतें, व एकंदर सर्व भाषांत संस्कृत भाषा ही विशेष सुसंस्कृत आहे, हे कबूल करणे भाग पडतें. आणि ह्मणू- नच आजकाल ती सुधारणेच्या अत्युच्च शिखराम जाऊन पाहोचली आहे, असे कोणाच्यानेंही नाही ह्मणवणार नाही. याविषय पाश्चात्य भाषाकोविदांचे काय अभिप्राय त्याविषयी पाश्चात्य आहेत, व तत्संबंधी त्यांचें कशा भाषाकोविदांचे अभि- प्रकारचें मत आहे, याबद्दल या ठि प्राय. बिलकुल अप्रासंगिक काण थोडाबहुत उल्लेख केला तर होणार नाहीं. कारण, ज्या गोष्टीचें समर्थन आपण करितों आहों, त्याचें पुष्टीकरण तिन्हाइत अशा विद्वान गृहस्थांकडूनच झाले तर त्यास जास्त बळ- कटी येऊन, आपल्या भोंवतीं आपणच दिवा ओंवाळून घेतल्याचा दोष व प्रमाद टळतो. 66 प्रसिद्ध सर वुइल्य॑म् जोन्स हे संस्कृत भाषेविषयी असे लिहितात की “ तिची रचना विलक्षण असून ग्रीक भाषे- पेक्षां देखील ती जास्त पूर्णदशेस आली आहे; व लाटिन् भाषेपेक्षांही तिच्यांत शब्दप्रकाशन आणि ओजस् हे गुण अधिक असून, त्या सर्वोत ती अत्युत्तम व उत्कृष्ट आहे. "" १ “ It is of a wonderful structure; more perfect than the Greek, more copious than the Latin, and more exquisitely refined than either. 39 Sir William Jones (Asiatic Researches, Vol. 1 P. 422)