पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ भारतीय साम्राज्य. [ भाग व परंतु हिंदूंचें हें पूर्ववैभव हल्लीं केवळ नामशेषच अ- सून, तें गत गोष्टीचा केवळ कथाभाग मात्र होऊन राहि- लें आहे. त्यांचें तें स्वातंत्र्य व तें शौर्य, तो कार्यक्षमता न तो आत्मपरायणता, तो परार्थ व तो स्वात्मविनियोग, ही बहुतेक संपुष्टांत आल्यामुळे अगदीच लयास जाऊं पाहत आहेत. आणि कालचक्राच्या प्रचंड फेज्यांत सांप- ढल्या कारणाने आम्ही केवळ परतंत्र व हतवीर्य झालों आहों ! ! ! तथापि, दुःखांत सुख येवढेंच कीं, अशा प्र- कारच्या विकल दशेंत, आम्ही ज्या परद्वीपीय प्रभूं- च्या अमलाखाली आहोंत, ते पुष्कळ अंशी दयाळू असून त्यांच्या समजुतीप्रमाणे योग्य ते राजकीय हक्क आह्मास देण्यास ते मनापासून झटतात. १ अखिल भरतखंडांचों राज्यसूत्रे मराठ्यांपासूनच इंग्रजांस प्राप्त झालौं, असें प्रांट्डफ्नै देखील आपल्या मराठ्यांच्या इतिहासांत लिहिलें आहे. ते असे लिहितात की:-

  • “ The object of this work is to endeavour to

afford some information respecting the condition of the Marathas under the Mahomedan dynasties, and to trace more clearly than has yet been done, the rise, progress, decline, and fall of our predecessors in Conquest in India, whose power, it will be perceived, was gradually gaining strength before it found a head in the far-famed adventurer, Sivaji Bhonslay. (Grant Duff's History of the Marathas 3rd Edn. P.19) ""