पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था.७१ परंतु इस्लामशाहीच्या टोळधाडींत, तें सर्व काही लयास जाऊन, हिंदुस्थानांत चोहोकडे हाहाःकार झाला. विद्येचा म्हास होऊन लोकांस दौर्बल्य येत चाललें. आणि धर्मभ्रष्टतेमुळे सर्वत्र संक्षोभ व अप्रीति उत्पन्न झाली. जिकडे तिकडे जुलुम मातला, व त्याचें फळही ताबडतोब मिळालें. अशा स्थितीत, हिंदूंनी आपल्या पराक्रमानें साम- र्थ्यानें अखिल भरतखंडाचें साम्राज्य आणखी एकदां मिळविलें, आणि त्यामुळे आमची हिंदुपदपादशाही पुनश्च स्वस्थानापन्न झाली. व ही गोष्ट कोणाही इतिहासज्ञाला कबूल करणें भाग आहे. १ “Under the Mahomedan conquerors, the land was cursed with oppression and cruelty, the only road to preferment being conversion to Islamism. " (Ward's India. P. P. 72/73) २ "The celebrity of the Marattas was reserved for recent times, when they were destined to act a greater part than all other Hindu nations, and to make a nearer approach to universal sovereignty than any of those to whom modern writers have ascribed the enjoyment of the empire of India." (Elphinstone's India P. 433. Vol. I) “ The British won India, not from the Mughals, but from the Hindus.' (Dr. Hunter's India Empire. 2nd Edn. P. 316.)