पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. १९ हिंदुधर्म केवळ रसातलासच पोहोचविण्याचें मनांत आणिलें. परंतु ईशकृपेनें त्यांचें दुष्ट व क्रूर हेतु जेथल्या तेथेंच थिजले जाऊन, अखेर हिंदूंच्या भगव्या झेंड्यासच भर समशेरशाहींत देखील चांगली जयश्री प्राप्त होऊन, तो सुमारे दीडशें वर्षेपर्यंत या आमच्या दयित आर्यभूमीवर एकसारखा फडकत राहिला. आणि तित- क्या मुदतींत हिंदूंनी आपल्या यशोदुंदुभीचें अति तीक्ष्ण ताडण हिमालयापासून तो तहत् सिंहलद्वीपापर्यंत करून, द्वीपांतरी, व जिकडे तिकडे, ब्राह्मण " आणि " मराठे " यांचें नांव " भयप्रद करून सोडिलें. इतकेंच नाही तर, अखिल हिंदुस्थानची राज्यसूर्तेही कांहीं वर्षे आपल्या हातांत ठेवून, त्यांतील सर्व राजे रजवाड्यांवर, मांडलीक प्रभूंवर, आणि खुद्द दिल्लीच्या पादशावर देखील त्यांनी आपली उत्तम छाप बसविली व सर्वांस करभार द्यावयास लाविले. त्यामुळे, " हिंदुस्था 66 " १ Bâlaji Baji Row was now sovereign in reality, though he continued to reign under the old name of Peshwa. During the reign of Balaji Baji Row, the Maratha power attained its greatest limits and received its most crushing blow, "* "The Muhammadan power in the Dakhan was thus reduced to the narrowest limits, and over the [ पुढे चालू. ] 66