पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. ११ इतर चक्रवर्ती राजे. तदनंतर मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या भरतखंडा- वर होईपर्यंत, वंगे, कान्यकुब्जे, हस्तिनापूर, इत्यादि प्रांतांतील रा नांनी आपले सार्वभौमत्व व हिंदुपादशाही पद कायम राखिलें, आणि हिंदुधर्माचें व संस्थांचे चांगल्या प्रकारें व यथेष्ट संगोपन केलें. हिंदुसाम्राज्याची ही परंपरा एकसारखी चालत आली नसती तर, आमचें हिंदुत्व लौकरच नाहींसें झालें असतें. १ बंगालच्या राजांचा अंमल हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, व ब्रह्मपुत्रानदीपासून तो तहत पश्चिमसमुद्र व सिंधु नदीपर्यंत, आणि तिच्याही पलीकडे कंबोज देशापर्यंत होता, असे अनेक ताम्रपत्रांवरून सिद्ध होतें. [ एलफिन्स्टनचा इतिहास पान ४०४ पहा. ] हे राजे पाल नांवाचे असून, त्यांनीं इसवीसनाच्या नवव्या शतकापासून तों अकराव्या शतकापर्यंत राज्य केलें. २ कनोजचा राजा सार्वभौम होता असे दिसतें. ह्या शहरची भित सभोंवार पंधरा कोस होती, आणि त्यांत तीस हजार तांबोळ्यांची दुकानें असत. “ Some Mahomedan writers pay the Raja the usual complement of supposing him Emperor of all India ; and Ebn Haukal, a century before Mahmud, mentions Conouj as the chief city of India. (Elphinstone's India P. 554.) ३ दिल्ली. पृथिवीराज हा दिल्लीचा शेवटला सार्वभौम राजा होय. “ The last Hindu Emperor of Delhi, the chivalrous Prithiraj of the chohan race. - ( Tod's Rajasthan P. 528 Vol. I)