पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) काल इ० स० पूर्वी चार हजार वर्षे, व त्याही पलीकडे जात असल्याचे सिद्ध होत आहे. इतकेच नव्हे तर, त्यांतील प्रमेयें देखील पाश्चात्य पंडितांस संमत आहेत. सबब सदरीं निर्दिष्ट केलेल्या प्रमाणांवर, आणि इतर आभ्यंतरीय पुरा- व्याच्या साधनांवर नजर देऊन, एकंदर वेदकालाचा निर्देश केला आहे. "भारतीय साम्राज्य" ग्रंथांत ज्या ज्या पुस्तकांचा मी उपयोग केला आहे, त्या त्या ग्रंथकारांचे मी बहुत आभार मानतों. असो. विद्वान, बहुश्रुत, आणि रसिक वाचकांपुढें मजसारख्या अल्पधीनें तें जास्त काय सांगावयाचें ! तथापि, “पुरुषमतिवैचित्र्या " वर नजर देऊन, या ग्रंथांत असलेल्या अनेक दोषांबद्दल वाचकांनी उदारबुद्धीनें क्षमा करून मजवर केवळ अनुग्रहच करावा, अशी मी आदरपूर्वक सविनय प्रार्थना करितों. मुक्काम पुणे. मंगळवार. मार्गशीर्ष) श्रु॥ ११ शके १८१५. विजयनाम- संवत्सरे. नारायण भवानराव पावगी. 1 “I confess that the author ( of the Orion ) has convinced me in all essential points. [["] ( Address delivered on commemoration Day, 22nd Feb. 1894, By Maurice Bloom Field. P. H. D. Professor of Sanskrit and Philology, Johns Hopkin's Univer sity. Baltimore. United States.)