पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) ११ प्रस्तुत पुस्तकांत १० पासून १४ पर्यंत, एकंदर पांच भाग आहेत. १० आर्याचे मुलनिवासस्थान, आर्याची सामाजिक रचना आणि धर्मसंस्था, १२ आर्यभाषा, १३ वेद व वेदांगें, आणि १४ महाभाष्यें व गद्यपद्यादि भाषाशास्त्र. ह्या पुस्तकांत ऋग्वेदाचा काल अगदी नूतन शोधा- वरून, मोठमोठ्या पौरस्त्य आणि पाश्चात्य पंडितांस जो मान्य झाल्यासारखा वाटला, तोच दिला आहे. तारीख ५ सप्टेंबर १८९२ रोजीं, लंदन् राजधानीत प्राच्यभाषाकोविदांची एक प्रचंड परिषद् भरली असून, तीत अध्यक्षस्थान पंडित मोक्षमुलर यांनींच स्वीकारलें होतें. त्यावेळी त्यांनीं असें बोलून दाखविलें कीं, भाषेच्या इतिहासावरून पाहतां, आर्य लोकांच्या अतिप्राचीन अस्ति- त्वाचा काल, ख्रिस्ती शकापूर्वी दहा हजार वर्षेपर्यंत पोहोचविण्यास हरकत दिसत नाहीं. तसेंच, पुण्यपत्तनांतील प्रसिद्ध सामाजिक पुढारी, व ऐटदार देशाभिमानी, आणि अगदी निर्भिड व निस्पृह विद्वान राजमान्य राजश्री बाळ गंगाधर टिळक, बी. ए; एल. एल. बी, यांच्या मृगशीर्ष नामक अत्युपयुक्त व दीर्घ परिश्रमानें केलेल्या पुस्तकावरून सुद्धां, ऋग्वेदाचा 1 The Orion, or researches into the antiquity of the Vedas.