पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. १७ चालविला होता. त्याप्रमाणे त्या कालांतही त्यांचा चोहोंकडे लौकरच दरारा वसून, त्यांच्या शत्रूचा वारंवार पाडाव होत चालला, असें वेद ऋचांवरून स्पष्ट दिसते. कारण, आज अमक्याला जिंकिलें, उद्या तमक्याला पळवून लावि- लें, आतां ह्या शत्रूंचे किल्ले घेतले, नंतर त्या शत्रूंची दाणा- दाण केली, अमुक राजांची कत्तल उडविली, तमुक फौज ठार मारली, इत्यादि उद्गार ऋग्वेदांत वारंवार आढळून येतात. त्यावरून आमच्या पूर्वजांनी प्रत्येक डोईजड १ " त्वायुजानि इत्यादि. ""महान् शत्रूचे सर्व बळ नाहींसें केलें. ( अ. ३ अ. ६ व १७. मं. ४ अ. ३ सू २८ ) ( २ ). २“ अहन्निन्द्रो इत्यादि. " 'दस्यु ह्मणजे अनार्य लोक ( कोळी, खोंड, भील, कातवडी, निवाद, वगैरे ) यांजला रानांत पळवून लाविलें. ) ( अ. ३ अ. ६ व १७. मं ४ अ. ३सू. २८ ) ( ३ ). ३ त्वमेतांजन राज्ञो द्विदेश। बंधुना सुश्रवसो पजग्मुः पष्टिं सहस्रां नवतिं नवश्रुतो निचक्रेण र॒थ्या॑ दु॒ष्पदा॑वृणक् ॥ ९ ॥ ( अ. १ अ. ४ व १६. मं १ अ. १० सू. ५३). ह्याचा तात्पर्यार्थ असा आहे कीं: - सुश्रवस् नांवाचा कोणी एक उपासक फार बलाढ्य अशा वीस शत्रू बरोबर लढत होता. त्यावेळी, त्याचें साहाय्य कर- यास कोणी देखील नसतां, इंद्रानें त्यास साहाय्य करून, त्या वीस शत्रूंस व त्यांच्या [ साठ हजार नव्याण्णव ह्मणजे ] असंख्य सैन्यास मारून टाकिलें.