पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची समाजिक रचना व धर्मसंस्था. १९ लोकांचा, व तदनंतर पाश्चात्यांचा जास्त शिरकाव या भरतखंडांत होऊं लागला. सबब मुलसमान लोकांचा किंवा इतर म्लेच्छांचा इकडे शिरकाव होण्यापूर्वी, आह्माला आमच्या देशांत चांगली स्वस्थता प्राप्त झाली होती यांत यत्किंचितही शंका नाहीं. यापूर्वी ही तक्षक, पारसीक, ग्रीक, आणि आरव लोकांच्या स्वा- या हिंदुस्थानावर झाल्या होत्या; तरी त्यांचें वास्तव्य या देशांत फार दिवस बिलकुल टिकले नव्हतें. आतां वेद- कालाला सुमारें पांच हजारांपासून साडेचार हजारपर्यंत वर्षे होऊन गेलीं अर्से घेतलें, अथवा स्थूल मानानें कमीत- कमी चार हजार वर्षे लोटली असावी असे जरी मानले, तरी आमच्याच प्रभुत्वाखाली, आमच्या मनाचा पूर्ण विकास व इच्छित उत्क्रांति होण्यास आझाला अजमास तीस शतकें, ह्मणजे तीन हजार वर्षे, सांपडली यांत बिलकुल शंका नाही. आणि इतका निर्वेध अवधि मिळाल्या- शिवाय, हिंदूंच्या मनाचा असा अलौलिक विकास, व ही निःसीम स्फूर्ति झालीच नसावी, असे आभ्यंतरीय प्रमाणावरून निर्विवाद सिद्ध होतें. आतां, देशांतल्या देशांत राजक्रांति होऊन जनप्रकोप किंवा प्रकृतिक्षोभ झाल्याची अनेक उदाहरणे आढळतात. तथापि, त्यापा- १ ह्मणजे वेद कालाच्या उत्तरार्धाला चार पांच हजार वर्षे होऊन गेली आहेत असे समजण्याचें.