पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ भारतीय साम्राज्य. [ भाग आणीवा- चाल देखील केली. आणि परचक्राच्या वेळीं व णीच्या संधींत तर, राजास भरपूर धीर देऊन आपणच प्रत्यक्ष संग्रामांन घुसले, व आपल्या यशोदुंदुभीची प्रखर गर्जना सर्वत्र प्रसृत केली. अस्तु. ह्यावेळी आर्यावर्तीत बहुतकरून चोहोंकडे शांतता असावी असे वाटतें. कारण, राजाश्रय मिळाल्यावांचून, अथवा शांततेचा चंद्रमा पूर्ण विकास पाव- ल्याखेरीज, ज्ञानोदधीस भरतीचा लोट येण्याचा संभवच नसतो. जिकडे तिकडे स्वस्थता, सर्वत्र विद्यावृद्धि, प्रजाजनांत समृद्धि, आणि लोककल्याणेच्छा, इतकी सर्व जागृदवस्थेत असली, ह्मणजे देशाच्या भाग्यो- दयास विचारावयासच नको. असा काल ईशकृपेनें आह्मी स्वतंत्रदेवतेचे निःसीम भक्त असतां कांहीं शतकें, किंबहुना बरीच शतकें, आमाला निर्वेध लाभला होता, असें म्हण ण्यास बिलकुल हरकत नाही. कारण, हिंदुस्थानांत सुलतान महमदची पहिली स्वारी इ. स. १००१ या वर्षी झाली असून, तेव्हांपासूनच स्थूल मानानें मुसलमान आर्यावर्त्तातील शांतता, व तिचा पारं- णाम. [ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ] that, without machinery, they could by patient toil raise even the meanest handiwork into a work of art, a real joy to the maker and to the buyer." (What can India teach us? P. 102.)