पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची समाजिक रचना व धर्मसंस्था. १३ मारून, आपले सर्व आयुष्य जगाच्या कैल्याणार्थ खर्च केले. आपली हांडे प्रजेच्या हितासाठी झिजविली; आपले ज्ञान राजकार्यात अर्पण केलें; आणि शेवटी आत्मोन्नति होण्यासाठी स्वतः वानप्रस्थाश्रम पतकरला. खरोखर हा त्यांचा मनोनिग्रह, ही त्यांची देशसेवा, व हे त्यांचें प्र- जाजनवात्सल्य, इत्यादि पाहून आपणासच काय पण ज गांतील प्रत्येक विचारी मनुष्यास आश्चर्य व कौतुक वाट ल्यावांचून राहणार नाही. त्यांनी आपल्या देशबांधवांस ज्ञानोदधि दिला. त्यांच्यासाठी नानाविध ग्रंथरूपे रत्न भांडार राखून ठेविलें. प्रजेचें सर्वतोपरी कल्याण केलें. राजास योग्य त्या काळी उत्तम प्रकारची सल्ला दिली. प्रसंगी त्याचे मंत्रीही झाले. वखत गुजरला तेहां स्वतः शत्रूंवर १ "The paramount position which the Brahmans won, resulted, in no small measure, from the benefits which they bestowed.” (Dr. Hunter's Indian Empire P. P. 94-96) २ “ For their own Aryan Countrymen, they developed a noble language and literature. The Brahmans were not only the priests and philosophers. They were also the lawgivers, the statesmen, the administators, the men of science, and the poets of their race." (Dr. Hunter's Indian Empire P. 97.) “ We know that they ( the ancient people of India ) too, could fight like heroes, and [ पुढे चालू. ] ३