पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व वर्मसंस्था ११ परस्पर रोटीव्यवहार व बेटीव्यवहार पूर्वीच्याकाळी होत असे. इतकेंच नाही तर, अनार्थ लोकांसही व्रात्यस्तोम करून आर्य वर्गीत शिरतां येई. आणि एकदां कां त्यांनी व्रात्यस्तोम केला, म्हणजे ते त्रैवर्णिकां- बरोबर सर्व प्रकारचा व्यवहार चालवीत, व ब्राह्मणही त्यांजपासून जाहीरपणें दक्षिणा घेत. व्यता. याप्रमाणे त्या वेळची सामाजिक रचना होती. ह्या वर्णाश्रमधर्म आणि समाजाची, व तदन्तर्गत प्रजापाल- ब्राह्मणांची इतिकर्त- नाची, योग्य आणि विचारपूर्वक व्यवस्था लावून, त्यांतील प्रत्येक वर्गाचा वर्णाश्रमधर्म, त्या प्रत्येकाचे अधिकार, आणि त्यां- चीं भिन्न भिन्न कर्मों, यांविषयी संपूर्ण मीमांसा करण्याचें अति प्रयासाचें काम, ब्राह्मणांनी आपण होऊनच तद्- नंतर सवडीप्रमाणे हाती घेतलें. कारण, प्रजेचें कल्याण, तिर्चे पालन, आणि तिची समृद्धि, हेंच स्तुत्य, व अति महत्वाचे हेतु, त्यांच्या हृदयांत रात्रंदिवस घोळत अस ल्यामुळे, मार्गदर्शनाकरितां व तदनुसार वर्तन होण्यासाठी, मार्गोपदेशक असा ग्रंथसमूह रचर्णे केवळ अत्यवश्य आहे, असे त्यांस पूर्णपणे वाटू लागले. आणि त्यासाठींच त्यांनीं तें काम सत्वर हाती घेऊन, आपल्या अलौकिक बुद्धिसामर्थ्यानें व अनुपम उत्साहशक्तीनें तडीस नेलें. ह्या वेळी ही एक गोष्ट विशेष रीतीनें लक्षांत ठेव