पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग रोचर, व वैश्यांस त्यांच्याच एका वर्णांतील मुलाबरोबर लग्न करण्याची सूट दिल्याचे आढळतें. तथापि, 'शूद्राम- प्येकेमंत्रवर्जम् ' असें जें वचन लागलेंच घातलेलें आहे त्यावरून, चाही वर्णीत पूर्वीच्या काळी लग्नव्यवहार निःसंशय सुरू होता असे दिसतें. मात्र इतकेंच कीं, शूद्र- विवाहांत वैदिक मंत्राचा प्रयोग बिलकुल करूं नये, ह्मणून आज्ञा असे. भिन्नभिन्न वर्णांच्या मुलींबरोबर शरीर- संबंध होऊन जी संतति होई, ती ज्या वर्णीतला पिता असेल त्या वर्णीत मोडली जाई. ह्मणजे आई कोळीण किंवा क्षत्रिय बाप ब्राह्मण असेल तर त्या दंपत्ती- पासून झालेली संतति ब्राह्मणच होय. जसें पराशराची बायको कोळीण होती तरी तो स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्याचा मुलगा ब्राह्मण. परशुरामाची आई क्षत्रिय होती तरी त्याचा बाप ब्राह्मण असल्यामुळे तो स्वतः ब्राह्मणांतच मोडे. आई ब्राह्मण पण बाप क्षत्रिय, म्हणून ययातीचा वडील मुलगा क्षत्रिय; तसेंच यया- तींची दुसरी बायको असूर जातीची होती, तरी तो स्वतः क्षत्रिय असल्यामुळे तिच्यापासून झालेला मुलगा क्षत्रियच समजावयाचा. द्रोण, कृप, व अश्वत्थामा हे ब्राह्मणक्षत्रिय होते. आणि भीष्म व जनक हे क्षत्रियब्राह्मण होते. ह्या एकंदर हकीकतीवरून सदरहू चान्ही वर्णीत व्रात्यस्तोम व उच्च. वगांत प्रवेश.