पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचनाव धर्मसंस्था. ४९ वर्णीतले लोक आपापल्या स्थित्यनुसार व पराक्रमाप्रमाणे, वरच्या प्रती- च्या वर्णीत जाऊं शकत. ह्मणजे क्षत्रिय वर्णापैकी ज्याने अत्युग्र तपश्चर्या केली असेल, अथवा ज्याचें अनुपम तपोबल व विद्यावल असेल, किंवा ज्याचें कुलगोत्र प्रसिद्ध असेल, तो ब्राह्मण वर्णीत शिरून त्यांतच मोडला जाई. विश्वामित्र हा मुळचा क्षत्रिय असून तो केवळ आपल्या तपोबलानें पुढे ब्राह्मण झाला असल्या- विषयीं, सर्वोस महशूर आहेच. साक्षात् वसिष्ठ हा वे- इयेचा पुत्र होता असं ह्मणतात. तोही पुण्याचरणानें त्या सर्वोचा परस्पर रोटीव्यवहार व बेटी- व्यवहार. ब्राह्मर्षि झाला. पराशराच्या गोत्राला वसिष्ठ गोत्राचा पोटभेद समजतात. परंतु ह्या पराशराची बायको जी सत्यवती, ती एका मच्छीमारूची मुलगी होती. जम दग्नीची बायको रेणुका, आणि अगस्तीची स्त्री लोपा- मुद्रा, ह्या दोन्ही राजकन्या असून, ब्राह्मण कुळांत पडल्या होत्या. त्यावरून त्यावेळी ब्राह्मण आणि क्षत्रिय, तसेच क्षत्रिय आणि वैश्य, या तीन वर्णीत परस्पर लग्नव्यव- हार होत असे, असे दिसतें. ययाति क्षत्रिय होता; तरी त्याची पहिली बायको ब्राह्मणाचीच मुलगी होती. पारस्करगृह्यसूत्रांत, ब्राह्मणांस तिन्ही वर्णातील मुलांबरोबर लग्न करण्याची सूट दिली आहे. तसेंच क्षत्रियांस दोन वर्णीतील मुलांब- हा ५