पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाम योगानें, पृथक् पृथक् जनसमूहावर जे अधिपति आपढ़ें प्रभुत्व चालवीत असत, त्यांची सत्ता आपोआपच वाढत गेली, आणि त्यांच्या ताब्यांत अधिकाधिक लोकसंख्या व देशमर्यादा येत चालली. तेव्हां अर्थात्च प्रजेचे पालन करण्याचा बोजा ज्यांच्या शिरावर प्रथमतःच होता, त्यांस सहजींच नृपत्व प्राप्त झाले. तदनंतर हें राज्यशकट चा- लविण्यास उचित श्रमविभाग करून, आपल्या कुटुंबांतील आप्तवर्गास, किंवा स्वकीयांस, अथवा अनुयायिजनांस, योग्यपदारूढ करणे अगदी अगत्याचें आहे असे या नर- पतींस वाटल्यावरून, त्यांनी क्रमशः त्या सर्वासच लहान- मोठा अधिकार देऊन, त्या सर्वामिळून एक लहानशी शि- बंदी बनविली. आणि यांपासूनच पुढे बलवत्तर असा क्षत्रिय वर्ग निर्माण झाला. तदनंतर राहिलेल्या विशांचा, अथवा अधिवासि- जनांचा, त्यांच्या उपजीविकासाव- वैश्यवर्ण, व नाप्रमाणे, निराळा तिसरा वैश्यवर्ग झाला; हा वर्ग पशुरक्षा, वाणिज्य, व्याजबट्टा, वैश्य कर्म, आणि कृषिकर्म, असे करी. शेवटीं, बाकी जे लोक राहिले त्यासर्वामिळून शूद्र नांवाचा चौथा वर्ग झाला; व इतर वर्गीची सेवा क रणें, हेंच ह्या वर्गाचें कर्तव्यकर्म राहिलें. शूद्रवर्ण आतां, वर जे चार वर्ण सांगितले त्यांपैकी, पहिल्या तीन