पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ भारतीय साम्राज्य. प्रस्तावना. नष्टोमोहः स्मृतिर्लब्धात्वत्प्रसादान्मयाच्युत । या सेवकानें पूर्वार्धाच्या पहिल्या पुस्तकांत, एकंदर नऊ भागांत, भरतखंडाचा देशवृत्तांत दिला. आणि त्यांत १ देशस्थिति, २३ उद्भिज्जसंपत्ति, ४५ कृषिकर्मपद्धति, ६ प्राणिजातिसंपत्ति, ७ खनिजसं- पत्ति, ८ वातावरणमीमांसा, व ९ भरतखंड भूरचना, यांजविषयीं कसेंबसे यथामति वर्णन केलें. आतां, पूर्वार्धाच्या प्रथम पुस्तकाच्या प्रस्तावनेंत सूचित केल्याप्रमाणे, ह्या द्वितीय पुस्तकांत आर्यलोक व त्यांचें बुद्धिवैभव, याविषयीं थोडासा वृत्तान्त देण्याचें काम हाती घरले असून, ते कसे तडीस जाईल याविषयीं माझें मन अगदर्दी साशंक होते. परंतु श्रीच्या कृपेनें, पूर्व संकेतानुरूप, तें सर्व शेवटास गेले, ह्मणून मी त्या श्रीस- द्गुरूचा अत्यंत ऋणी आहे.