पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. ४९ ह्मणून, देवतांस बोलाविण्याचे काम जो ऋत्विज करी, त्यास होता ह्मणत. ऋतूमध्यें होम करण्याचे काम जो करी, त्यास अध्वर्यू ह्मणत; उदगीथ गाई त्यास उद्गाता; प्रस्ताव गाई त्यास प्रस्तोता; प्रतिहार गाई त्यास प्रति- हर्ता; आणि ऋतूमध्यें दुसरी उठण्याबसण्याची जो खट- पट करी, त्यास प्रतिमस्थाता असें ह्मणत. सामाचे तीन भाग केल्याचे दिसते. पहिल्या भागास प्रस्ताव ( किंवा आरंभ ) ह्मणत; दुसन्यास उदगीथ; आणि तिसन्यास प्रतिहार ( म्हणजे शेवट ) ह्मणत. होतार, यजुर्वेद ब्राह्मणां तील अध्वर्यु, सामवेद ब्रम्हणांतील उद्गातार, आणि अथर्ववेद ब्राम्ह णातील पुरोहित, त्या प्रत्येकांची कर्मे, त्यांचे भिन्न भिन्न अधिकार, व त्याविषयी पृथक् पृथक् नियम, यांबद्दल सविस्तर विवेचन ज्या त्या वेदांत केलेले आहे. तथापि, ह्या ठिकाणी इतकें सांगणे अगदीं जरूर आहे की, हा वेदकालीन कर्मविधि, त्याचे संपूर्ण निरूपण, तत्संबंधीं संप्रदाय, त्याविषयींचे विचार, त्या कामीं भिन्न भिन्न मत- प्रकाशन, आणि तन्निरूपणार्थ अर्थविन्यास, हीं दिव- सानुदिवस इतकी वाढत चालली, व त्यांचे परिमाण इतके स्थूल झाले की, त्यांचे स्मरण राहण्याचे अगदीच कठिण पडूं लागले. त्यामुळे त्या सर्वोचेंच संक्षेपतः एकीकरण कर ऋग्वेद ब्राम्हणांतील कर्मविधींचें एकीकरण.