पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ण्याची मोठी अवश्यकता होती. पण ह्या महत्वाच्या का- माचा हिंदूंनी वेळींच योग्य विचार केला; आणि लागलेंच ते काम हातीं धरून नेहेमीप्रमाणे, आपल्या बुद्धिप्रभावानें, षटुवैदग्ध्यानें, व अति परिश्रमानें तें त्यांनी सिद्धीसही नलें. याबद्दल आम्ही आपल्या पूर्वजांचा जितका आभार मा- नावा तितका थोडाच. कारण, ह्या त्यांच्या दीर्घोद्योगानें श्रुतिस्मृतिसारखा अमूल्य ग्रंथसमूह सर्वभक्षी काळाच्या जबड्यांतून वांचला जाऊन, तो आपल्या ज्ञानदीपानें अखिल जगाचे डोळे दिपवून टाकण्यासही कारणीभूत झाला. असो. वर सांगितल्याप्रमाणे वेदांत सांगितलेला कर्म- विधि करण्यास पुरोहित, ऋत्विज, आणि श्रोत्रिय, यांची फार जरूर हो- ब्राम्हण वर्ण. ती. त्यामुळे कालवशात् हा वर्गत्रय इतका प्रचंड बनला कीं, तो फक्त परंपरेनेंच तत्तत्स्थानापन्न झाला. इतकेंच नाही तर, तो वेदकालीन मंत्राचें केवळ पवित्र भाजनच होऊन राहिला. यामुळे ब्राह्मणांशिवाय इतर वर्गीस तत्संबंधी ज्ञान, किंवा ऊहापोह करण्याचे सामर्थ्य अथवा, विवेचनशक्ति, बिलकुल राहिली नव्हती. आणि त्या कारणानेच ब्राम्हणांचें श्रेष्ठत्व व वर्चस्व, निसर्गतःच वा- ढलें; आणि तें पुढें पुढें इतक्या गुरुत्वास जाऊन पोहोचलें की, त्यांच्यासारखें धर्माध्यापकप्रभुत्व, आणि आचा-