पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग वृह् किंवा बृह् (ब्रुहिविस्तारे) या धातूपासून झाला असून, तो ब्रम्हमंत्र ह्मणणारे ते ब्राम्हण होत. परंतु ब्राम्हण शब्दांची दुसरीही खाली लिहिल्याप्रमाणें व्युत्पत्ति आढळते:- जन्मनाजायतेशूद्रः संस्कारैर्द्विज उच्यते । कर्मणायातिविप्रत्वम् ब्रम्हजानातिब्राम्हणः || ( मनुस्मृति ) कोणी या स्मृत्युक्तीप्रमाणे ब्रम्ह् जाणतो तोच ब्राम्हण होय. ब्रम्ह मंत्रांतील ऋचांपैकी एकींतील असा अभि प्राय आहे कीं, ' आम्ही केलेल्या स्तवनाचा उपहास करील, त्याजवर अत्युग्र अनर्थ गुजरून येवोत; आणि त्या ब्रम्हद्वेष्ट्याचें चंडांशु तापाने दहन होवो. ब्राम्हण क्षत्रिय शब्दांचें आदिकथन ऋग्वेदांत खाली लिहिलेल्या ऋर्चेत आढळून येतें. 9 यदि॑न्द्राग्नी॒ मद॑थ॒ स्वे दु॑रो॒णे यद्ब्रह्मणि राजनि वायजत्रा । अतः परि॑वृषणावा हि यातमा सोम॑स्य पिबतं सु॒तस्य॑ ।। - (ऋ. अ. १ अ. ७ व २७ मं. १ अ. १६ सू. १०८. ) जे मंत्र मेधांत ह्मणतात, त्यांस यजुस् ही संज्ञा आहे; जे इष्टींत ह्मणतात त्यांस छंदम्; आणि जे स्तोमांत ह्मणतात त्यांस सामन् अशी संज्ञा आहे. छंवें व त्यांचीं पृथक् पृथ- क् कर्मे.