पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११वा] आर्यांची सामाजिक रचना व धर्मसंस्था. ४३ समूहांत बुद्धिमत्तेनें किंवा विद्वत्तेर्ने, तपोबलानें अथवा पराक्र मानें, जो सर्वात श्रेष्ठतम असे तोच सर्वांचा चालक होई, आ णि त्या कारणानें त्याच्याकडेसच सर्व समाजाचें नियंतृत्व येई. कार्लेकरून, हा समुदाय व अशा प्रकारचा लोकसमाज ज्या मानानें वृद्धिंगत होत गेला, त्याचप्रमाणानें या लोक- निर्मित प्रभूकडे प्रजापालनाचा अधिकार आला, व त्यामुळे त्यास साहजीकच राज्यधूरीणत्व प्राप्त झालें. त्या पुरातन पुरोहित वर्ग रचना. वेदकाळीं, होम हवनक्रियेचें मोर्डेच महत्व असे. त्यामुळे, तत्संबंधी वेदवि- हितकर्म करण्यांत जे ऋषि प्रवीण, कुशल, आणि विद्वान् असत, त्यांजवरच सर्वांची मदार असून, याज्ञिक चालविण्यासाठी त्यांसच निरंतर पाचारण होई. ह्या कारणानें पुरोहितवर्ग, ऋत्विजगर्व, आणि श्रोत्रियवर्ग, यांची निरंतर जरूर पडे; व ह्मणूनच ह्या वर्गाची महत्वी व संख्या, दिवसानुदिवस अधिकाधिक वा ढत चालली. होमादि क्रियांनीं, व होम समयीं उच्चारले- ल्या मंत्रांनी, आपणास खचित यशप्राप्ति होते, अशी त्यावेळी हिंदूंची समज असे, व त्याप्रमाणे त्यांस फलप्रा- प्तीही होई. त्यायोगानें त्यांच्या श्रद्धेस चांगलेच पुष्टीक- रण मिळत गेले, आणि ती पुढे तशीच वृद्धीप्रत पावली. ह्या होमक्रियांतील सामर्थ्यप्रद मंत्रांस 'ब्रह्म' अशी संज्ञा आहे. ब्रह्म शब्द त्यांचे मंत्र,