पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ११ वा. आर्यांची सामाजिक रचना आणि धर्मसंस्था. आमचे पूर्वज मूळचे भरतखंडांतले असोत, किंवा आर्यसमाजरचना. त्याच्या आसमंतांतील पठार प्रदे- शांतून वायव्य दिशेने येथें आले अमोत, इतकी गोष्ट मात्र उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक प्रमाणांवरून, आणि विशेषत: वेदरूप दर्पणावरून, उत्- कृष्ट रीतीनें प्रतिबिंधित होते कीं, आर्याच्या मनावर सृष्टिवैभवाचे पूर्ण संस्कार होऊन, जेव्हां त्यांचे उद्गार छान्दस वृत्तांत प्रथमच बाहेर पडले, तेव्हां त्यांचा स- मुदाय बराच मोठा होता. त्यामुळे, आपापसांत व्यवस्था राहण्यासाठी पृथक् पृथक् मेळयानें, किंवा निरनिराळे कळा करून, ते राहिले असावे असे दिसतें. प्रत्येक कळपांत कोणी तरी एक नियामक असून, प्रत्यक्ष त्या- च्याच देखरेखीखालीं सोंपलेल्या समुदायवर्गाचे योग्य तीनें संगोपन करण्याविषयीं, तो फार दक्ष असे. या नियामक