पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचें मूलनिवासस्थान, त्याच्या स्वस्तिक्षेमार्थ प्राचीन आर्यऋषिकवींनी फारच उत्तम प्रकारच्या ऋचा रचल्यासारखें दिसतें. सबब त्यांचा भावार्थ खाली देतों :- 66 हे आत्मन्, ज्या मार्गानें आपले पूर्वज गेले, त्याचेंच तूं अवलंबन कर. तेथे आपल्या पूर्वजांस आणि यमधर्मराजास जाऊन भेट. आपले वैकल्य सोडून पर धामाप्रत प्राप्त हो. त्या ठिकाणी ज्योतींत ज्योत मिळून तेजोमय कैवल्यरूप धारण कर. ज्या ठिकाणी अमृताच्या नद्या वाहतात, अशा ठिकाणीं तूं संचार कर. ज्यांनी एकसमयावच्छेदकरून निरंतर ध्यानस्थ राहून, षड्शत्रूंचा पुरा पाडाव केला, व त्यांजवर जय मिळविला, आणि तेणें- करून जें असाध्य त्याचें साधन केले; तसेच ज्यांनी केवळ परोपकारासाठी, व लोककल्याणार्थच आपली हार्डे झिजवून आपण पंचतत्वाप्रत गेले; अशा पुण्यशील महा- त्म्यांचा तुला सत्समागम होऊं दे. "