पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग प्रेतदहनश्रेष्टत्वाविषयीं लोकमत कार्लेकरून जागृत झालें, आणि इ. स. १८८४ साली प्रेतदहनासाठी लोकांस स्म- शानभूमि अभिगम्य होऊन, इ.स. १८८५ सालीं वोकिं- ग येथें तीन प्रेतांस दहनक्रियेचा संस्कार घडला. तदनंतर इ.स. १८८६ साली दहा, १८८७ सालीं तेरा, १८८८ सालीं अठ्ठावीस, १८८९ साली शेचाळीस, १८९० साली चोपन, आणि १८९१ सालीं जून अखेरपर्यंत साठ, याप्रमाणे प्रेतें दग्ध झाली असून, ह्या दहन क्रियेची पाश्चात्य देशांत हल्ली उत्तरोत्तर चढती कलाच दिसत आहे. इ. स. १८९१ साली, ब्रिटिश मेडिकल असोशिएशन नामक सभा बोर्नमौथ येथें भरली होती. तीत वैद्यशास्त्रवि शारद असेच सर्व सभासद असून, त्यांनी सर्वानुमतें असा ठराव केला कीं, सांप्रतची प्रेतें पुरण्याची चाल अगदी नापसंत असून, त्याऐवजीं मृतकायेचे सर्व भाग जेणें- कडून पंचतत्वांप्रत सत्वर जाऊन मिळतील अशा युक्तीची अवश्य योजना केली पाहिजे. आतां, ही युक्ति म्हटली म्हणजे दहनकि याच असून, ती कोणास देखील बीभत्स, दोषार्ह, किंवा असुखद वाटणार नाहीं. १ “ That this meeting disapproves the present custom of burying the dead, and desires to substitute some mode which shall rapidly dissolve the body into its component elements, by a process which cannot पुढे चालू.