पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आर्याचे मूलनिवासस्थान. हा अग्रणी होय. त्यावेळी त्याजवर तद्देशस्थ लोकांच्या गालिप्रदानाचा इतका भडिमार झाला कीं, तो सांगतां पुरवत नाहीं. या शोधक पंडितानें ज्या गोष्टीचें प्रतिपा- दन केलें, त्याबद्दल सत्यासत्यतेचा बिलकुल विचार न करितां, तिकडील लोकांनी त्याजवर सुमारे वीस वर्षे यथेच्छ तोंड सोडिलें होतें. ह्यावरून इतकें सिद्ध होतें की, हल्लींच्या मोठमोठ्या सुधारलेल्या राष्ट्रांत देखील नूतनमताविषयीं, मग ते कितीही खरें आणि यथार्थ असले तथापि, द्वेषबुद्धि उत्पन्न होते. इतकेंच नाहीं तर, तदन्त- र्गत सत्यान्वेषणाविषयीं सुद्धां, लोकसमुदाय अगदींच पराङ्मुख असल्या कारणानें, नवीन शोध अथवा एखादी नवीन कल्पना, हीं निदान प्रथमारंभी तरी विशेष रीतीनें उपहासास पात्र होऊन, तिची अत्यंत विटंबना होते. परंतु कार्लेकरून सत्यसूर्याचा प्रकाश हळू हळू चोहोंकडे पसरत जाऊन, 'सत्यमेवजयते' या ह्मणीप्रमाणे सत्याचा सर्वत्र पगडा बसतो, आणि असत्याचा लोप होतो. प्रेतदहनाविषयींची चर्चा ज्यावेळी इंग्लंडांत प्रथ- मतःच सुरू झाली, त्यावेळी धर्मगुरूंचे तद्विरुद्ध अभिप्राय, अधिकाऱ्यांचा तत्संबंधी पूर्ण कटाक्ष, तद्विषयक राजदं डाची विशेष भीति, आणि लोकमताचा तद्विरुद्ध गिल्ला, ही सर्व इतिहासदृष्ट्या फारच महत्वाची आहेत. असो. ह्या झंझावाताच्या संक्षोभाची शनैः शनैः शांति होऊन, ४