पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ भारतीय साम्राज्य. [ भाग गतजीवित देहाचा शेवटला संस्कार, दहनक्रियेइतका उत्तम, दुसरा कोणताही नाहीं. देहदहनप्रसार. आणि आमच्या आर्यावर्त्तीतील ही प्रेतदहनक्रियेची चाल अगदीच साधी असून सर्व प्रका- रेंच सोयीची असल्यामुळे, फार प्रशस्त आहे, याविषयीं बिलकुल शंका नाहीं. हा दहनक्रियेचा प्रकार तत्त्व विचा- रानें, व शास्त्रीय दृष्टीनें, पाश्चिमात्य राष्ट्रांस देखील इतका सुखकर वाटत चालला आहे की, त्यांचा प्रचार तिकडील देशांतही दिवसानुदिवस वृद्धिंगत होत चालला आहे. प्रस्तुतकाळी सुधारणेच्या कामांत जर्मनी अग्रेसर अ सल्यामुळे, तिकडे दहनक्रियेचा संप्रदाय फारच जारीनें सुरू आहे. या कामासाठी, त्या देशांत गोथा येथें स्वतंत्र स्मशानभूमि इ. स. १८७७ साली तयार झाली असून, हल्लीं तेथें दरसाल सुमारें पांच सहारों प्रेतें दहन होतात. ओल्सडॉर्फ येथें दुसरी स्मशानभूमि गेल्या आगष्ट सन १८९१ महिन्याच्या २२ व्या तारिखेस स्थापन झाली. आणि तिसरी स्मशानभूमि इ.स. १८९१ च्या आक्टो- टोबरांत कलश्रुहे येथें बांधली. इंग्लंडांत प्रेतदहन क्रियेसंबंधी चर्चा इ. स. १८७४ साली सुरू झाली असून, त्या कामांत सर हेन्री टॉमसेन् १ The Contemporary Review 1894. January Number. " Our Treatment of the dead. "