पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० ] आर्याचें मूलनिवासस्थान. मृतक्रिया. पापाच्या पाशापासून वरुणे आम्हास मुक्त करो. आणि अदितीच्या आश्रयाने आमचे संरक्षण होवो. हे देव हो, तुम्ही आमचें संरक्षण व कल्याण करा. आर्य लोकांत वैदिककालांत, देहावसान झाल्यावर, त्याची शेवटची व्यवस्था निखनक्रिये- नें ह्मणजे पुरून, किंवा दहनक्रियेनें ह्मणजे जाळून, होत असे. आर्याची जी पारसीक नामक शाखा इराणांत होती, त्यांत अग्नि फारच पवित्र मानला असल्या कारणानें, अग्नीला गतजीवित देहाचा विटाळ होऊं नये एतदर्थ, ते नियमित अशा उघड्या प्रदेशावर प्रे ठेवून, तो गृध्रादिपक्षांकडून खाववीत. आणि ही पारसीकांची फार पुरातन काळची चाल आज मितीसही प्रचारांत असल्याचे दृष्टीस पडतें. सांप्रत काळी पारशी लोक मोठमोठे कुवे खणून त्यांतच प्रेते ठेवितात. ह्या कुव्यांस " भस्ते " असें ह्मणतात. हे चुन्यानें शास्त्रोक्त रीत्या बांधून काढून, त्यांतत्र प्रेतें ठेवण्या- करतां, निरनिराळ्या, व मोठमोठ्या कोनाड्यासारख्या, जागा करतात. त्यांत प्रेतें आणून ठेविल्यावर, त्यांचा हं हं ह्मणतां गृध्रराज फडशा उडवून टाकतात. १ विअस्मत्पाशंवरुणो मुमोचत् । अपोवन्वाना अदितेरुपस्थायं पातस्वस्तिभिः सदानः || ( ऋ. ७. ८८. ७.)