पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ भारतीय साम्राज्य. [ भाग हे अंदिती, मित्रा, आणि वरुणा, आमच्याकडून झा लेल्या अपराधाची तुम्ही क्षमा करावी. व हे इन्द्रा, तूं अह्मास विपुल प्रकाश आणि अभय दे. यज्ञांचे नायक आणि राजे वरुण, मित्र, व अर्यमा, तसेंच अप्रतिहत देवी अदिती, ही आम्हास निष्पाप करून दुःखाच्या पार पाडोत. हे आग्न, आम्ही जें कांही पाप केलें असेल, त्याची तूं आम्हास मनापासून क्षमा कर. तसेच अर्थमा व अदि- तीही आम्हास क्षमा करोत. १ अदिते मित्रवरुणउतमृळयत्वःवयं चक्रमकतंचित् आगः । उरुअश्याम्अभयं ज्योतिरिन्द्र || ( ऋ. २. २७. १४. ) २ अयंहिनेतावरुणऋतस्यमित्रो राजानोअर्यमा. पोधूः । सुहवादेव्यदितिरनर्वातेनो अंहोअतिपर्ष- अरिष्टान् || ( ॠ. ७. ४०. ४.) ३ सोअग्नएनानमसासमिद्धोच्छामित्रं वरुणं मिन्द्रं वोचेः शिश्रयन्तु ॥ । यत्सीमागचक्रमातत्सुमृळतदर्यमादितिः ( ऋ. अ. ६ व १७. मं. ७ अ. ६ सू. ९४. )