पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा ] आर्याचे मूलनिवासस्थान. सच या निरपराधी अदितीसारख्या पूज्य गाईस तूं मारूं नकोस; ' अशा अभिप्रायाचा मंत्र ह्मणून, मधुपर्का साठी आणिलेली गाय सोडून दिल्याचा जो संप्रदाय वाच ण्यांत येतो, तो हरि सारख्या गोपांच्या संततीचा फार वर्षे सत्संग झाल्यामुळे पडलेला दिसतो. इराणांत सुद्धां गाय म्हणून पूज्यच असे. व त्यांचे वंशज हल्लींचे पारसी हे तिला आजमित्तीसही पूज्य मानतात. मिश्र देशांतील लोक देखील गाईस पूज्य मानीत. इतकेंच नाही तर, यवन ( ग्रीक ) लोक हे गोमांस भक्षण करीत म्हणून, त्यांच्या भांड्यांस ते स्पर्श देखील करीत नसत. नार्वे आणि स्वीडन येथें, पूर्वी ज्या लोकांची वस्ति होती, त्यांस स्कांद ह्मणत, हे लोकही गाईला अतिपूज्य मानीत. आपणावर भूदेवता, आकाशदेवता, व स्वर्देवता, इत्यादिकांची कृपा असावी म्हणून नानाविध साधनांनी त्यांस संतुष्ट पश्चात्तापशुद्धता. राखण्याकरितां, जरी आमचे तत्कालीन ऋषि निमग्न असत, तरी काया, वाचा, आणि मन, यांजकडून जाणून- बुजून अथवा गैरसमजुतीनें जें कांहीं दुराचरण घडले असेल, त्याचें क्षालन अवश्य झाले पाहिजे, किंवा त्या- बद्दल निदान क्षमा तरी जरूर मिळाली पाहिजे, हे त्यांस चांगलें अवगत असे. आणि ही गोष्ट ऋग्वेदांतील ऋचां- वरून चांगली प्रत्ययास येते,