पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ भारतीय साम्राज्य [ भाग अनेक देवता, व लोकपाल, यांचे संतर्पण होत अस ल्याचे दिसते. मधुपर्क. 66 पूर्वी मांस खाणे, किंवा मद्य पिणें, याविषयी कोणीही निषेध बाळगीत नसत. मांसभोजन घालणें, किंवा मद्यपान सेवा करणें, यांतच विशेष आदर, व आतिथ्य, आहे असे त्या वेळचे लोक मानीत. कोणी वेदज्ञ किंवा सन्माननीय अतिथि घरीं आला तर, त्याच्यासाठी मुद्दाम गाय कापण्याची, किंवा 'मधुपर्क " करण्याची चाल, त्यावेळी ब्रम्हावर्त्तीत असे. मधु शब्दाचा अर्थ मद्य होय. हे मद्य प्रथम अतिथीस पिण्यास देऊन, नंतर त्याच्या नांवानें गाय कापून, तिचे मांस शिजवून, ते जमलेल्या मंडळींनी भक्षावयाचें, अशी, त्यावेळी चाल होती. यामुळे अतिर्थास “गोघ्न" ही ह्मणत. " ज्याच्यासाठी गाय कापिली जाते तो गोघ्न, ' अशी व्युत्पत्ति पाणिनीने दिली आहे. परंतु कालवशात् शूरसेन देशांत जेव्हां ब्रह्मवर्तीतील लोक पसरले, तेव्हां हरि नामक लोकांबरोबर त्यांचा निकटसंबंध पडल्यामुळे, गाई व बैल यांजविषयी त्यांची पूज्यबुद्धि होत ● चालली. आणि त्यामुळेच आतिथ्यादर निमित्य, गोहत्या करण्याची चाल अखेरीस बंद पडली असावी. 'ही गाय ११ अकरा रुद्रांची माता, आठ ८ वसूंची मुलगी, १२ बारा आदित्यांची बहीण, व अमृताची खाण आहे; ,