पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० वा] आर्यांचें मूलनिवासस्थान. 66 इष्टि. ' इष्टि " हा शब्द यज् धातूपासून निघाला असल्याचें दिसते. कृषिकर्म करणारे सर्व लोक, देवतांना संतृप्त करण्यासाठी, प्रायः अहिंसामय पदार्थाचाच नैवेद्य दाखवीत. या लोकांत इष्टीचें मोठें प्राधान्य असे, असे वाटतें. सूत्रांत जितक्या ह्मणून इष्टि येतात, तितक्या सर्व अहिंसक असाव्या अशी कल्पना आहे. स्तोम शब्द याज्ञिक भाषेत वारंवार आढळतो. त्याचा मूळचा अर्थ स्तुतिवाचक असावा असे वाटतें. इष्टीनें देवतांस नैवेद्य दाख- स्तोम आणि वीत, व स्तोमानें त्यांची स्तुति करीत. सोम. सोम है एक लता विशेषाचें नांव असून, त्याचा यज्ञाच्या कामी उपयोग करीत. त्या- पासून जो रस निघे तो अमरत्व देतो, अशी त्या वेळची समजूत असून, तो मादक अस- ल्यामुळे वेदकालीन ऋषी त्याचा मदिरेप्रमाणें उपयोग करीत. हा सोम पूर्वी गंधर्वांमध्ये होता, व त्यांजकडून तो शुनःशेणाला प्राप्त झाला, अशी आख्यायिका श्रुतीत आढळते. .. याप्रमाणें मेध, इष्टि, स्तोम, आणि सोम, असे यागाचे चार प्रकार प्राचीन काली प्रचारांत असून, त्यांनीच