पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० भारतीय साम्राज्य. [ भाग 66 ल्या पोटी एखादें तरी पुत्ररत्न असावे असे त्यास वाटू लागले. पुढें, आपले इच्छित मनोरथ परिपूर्ण झाले तर 'पुरुष मेध" करीन असा हरिश्चंद्रानें नवस केला. त्या नंतर ईशकृपेनें त्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्यावर, केलेला नवस फेडण्यासाठी बलिप्रदानार्थ त्यास एका पुरु- घाची गरज लागली. तेव्हां तो मिळण्यास प्रथमतः फारच अडचण पडली. सचत्र द्रव्यादि नानाविध आकर्षणांनीं तो मिळे अशी तजवीज होण्यासाठी, राजाने हरएक प्रयत्न चालविले. त्यांत आंगिरस गोत्रांतील अ- जीगते नांवाच्या मनुष्यानें, सदरहू कामासाठी, आपला शुनःशेण नामक मुलगा विकण्याचें कबुल केलें. इतकेंच नाहीं तर, जास्त द्रव्याच्या आशेनें आपल्या पोटच्या पु- त्राची आपणच मान कापावयाची, हें जें दुर्घट, दुःखदा- यक, व अति साहसीकृत्य, तेंही त्यानें पतकरलें. वध्यस्थळी पुत्राची मान कापण्यास प्रत्यक्ष पिता तयार झाल्यावर, त्या कोमल अर्भकानें आपल्या म्लान वदनांतून हृदयद्रा- वक असा सुस्कारा टाकून, मोठ्यानें “हंबरडा " फोडला. त्यासरशी, त्या स्थळी विराजमान असलेल्या ऋषिमंडलां- पैकीं, विश्वामित्र महामनीस त्या बालकाची दया येऊन, त्यानें त्या शुन:शेणास सोडविलें; व पुढे त्यास आपला वारस करून त्याचें सर्व प्रकारें कल्याणही केले. त्यानंतर कांही वर्षांनी हा " पुरुषमेध " अजींच बंद पडला.