पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग शेवः॑ । तस्मा॑ ए॒तत्पन्य॑तमाय॒ज॒ष्ट॑म॒ग्नौ मि॒ त्राय॑ ह॒विराजु॑होत ॥ वरुण वगैरे स्वर्देवता. ( ऋ. अ. ३. अ. ४. व ६. मं. ३. अ. ५. स ५९ ). यजुर्वेदाचा जन्म वायूपासून झाला अशी कल्पना आहे. वरुण ही स्वर्देवता असून असूर लोक तिचे पूजन करीत, म्हणून ती असूर देवता कल्पिली आहे. श्रुतींत देखील वरुणास असूर शब्द लाविल्याचे आढळते. भृगु नांवाच्या ऋषीस प्रत्यक्ष वरुणाचा मुलगाच समजतात. याच भृगूचा मुलगा शुक्र असून तो साक्षात् असुरांचा गुरूच होता. यावरून वरुणाचा व असुरांचा मूळचाच संबंध असल्याचे दिसतें. २८ वरुणाच्या सूक्तांत, आपणांमधील सांप्रत चालू अस लेल्या देवताप्रतिमेचा चांगला आभास होतो, " मी वरुणाजवळ गेलों, व त्याला विचारिलें कीं, मी तुझी नीट सेवा करीत असतां, तुझा माझ्यावर राग कां ? " वगैरे प्रकारचा मजकूर अनेक ठिकाणीं सूक्तांतून आढळतो. याव- रून त्यावेळी वरुणाची प्रतिमा कल्पिली असावी असे वाटतें. यज्ञाचा वाचक मूळ शब्द 'मेध 'होय. मेध हा शब्द 'मेध्' धातूपासून झाला असून, त्याचा अर्थ मारणे किंवा ठार करणें, असा कापून बळी द्यावयाचा, अर्थव्यंजक असे नांव अनेक प्रकारचे मेध. होतो. हवन करण्यासाठी त्याच्या जातीवरून त्या यज्ञास