पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ भारतीय साम्राज्य. [ भाग ज्या ठिकाणी परिपूर्ण तेज निरंतर उपलब्ध आहे; जेथें जन्ममरण नाहीं; जेथें आनंद, मोद, मुद, आणि प्रमुद, यांचें सदैव वास्तव्य आहे; व जेथे आपले सर्व च्छित मनोरथ परिपूर्ण होतात, असे उत्तम स्थान प्राप्त होण्याविषयी, आर्य हिंदूंची अत्युत्कट लालसा त्या काळी देखील असल्याचें त्यांच्या उक्तींवरून दृग्गोचर होतें. ऋग्वेदांत अग्नि देवतेचें आवाहन फार पुरातन कालीही प्रथम केल्याचें दृष्टीस पडतें.. यावरून आर्य लोकांस अग्नि हा प्रथमपासूनच माहीत असावा असे वाटतें. परंतु जर ही गोष्ट प्रमाणादाखल मानली तर, पुरूरवस् याला अग्नीचा लाभ गंधर्वापासून झाला ह्मणून १ यत्रज्योतिरज॑स्रं यस्मिँ ल्लोके स्वर्हितम् । तस्मि- न्मांधे हिपवमानामृते लोके अक्षित इंद्रायेन्दो परिस्रुत्र ।। यत्रांनुकामं चरणं त्रिनाके त्रिदिवे दियः । लो- काय ज्योति॑ष्मन्त॒स्तत्र॒ माम॒मृत॑ कृ॒धीन्द्र॑ायेन्द्रो॒ प- रीस्रव ॥ यत्रान॒न्दाश्च मोदा॑श्च॒ मुद॑द॒ आसते । काम॑स्य यत्राप्ताः कामास्तत्रमाममृतं कृधीन्द्रायेन्दो परीस्रव ॥ ( ऋ. अ ५. व २८. मं ९. अ ७.सू ११२. ) अग्नि वगैरे भूदे - वता.