पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा ] आर्याचें मूलनिवासस्थान. पासून होणारी कुतूहलस्फूर्ति जसजशी कमी पडत चालली, तसतशी त्यांची विचारसरणी जास्त प्रगल्भ होऊन, भासमान सर्व प्रभावांचें आदिकारण एकच आहे, व अखेर अखिल विश्व ज्यापासून उद्भवलें आहे त्यांतच तें विलीन होणार, असे त्यांस वाटू लागले. त्या आदिकार- णास त्यावेळचे ऋषी निरनिराळ्या नांवांनी उच्चारीत. कोणी त्यास हिरण्यगर्भ म्हणत, को- णी यम, कोणी मातरश्विन, व कोणी अग्निही म्हणत. द्यावा, पृथ्वी, आणि आकाश, मिळून एकंदर तेहेतीस देव, आमचे आर्य हिंदु, वैदिककालांत मानीत असत. येदेवासो दि॒व्येकादश स्थ पृ॑थि॒व्यामध्येकादश स्थ । अप्सुक्षिततो॑ महिनैकादश स्थ तेदेवासोयज्ञमिमं जुषध्वम् || सर्वांचें आदि- कारण हिरण्यगर्भ. ह्मणजे द्यु लोकांच्या अकरा देवता, पृथ्वीच्या अकरा देवता, आणि अंतरिक्षाच्या अकरा देवता, याप्रमाणे क ल्पून, मनोभावानें ते त्यांचें आवाहन करीत. आतां स्वर्देव- तांत सूर्य, उपसू, इत्यादिकांचा समावेश होई; भूदेवतांत अनि, नद्या, पर्वत, व सागर, यांचा समावेश होत असे; आणि आकाश देवतांत वायु, मरुत् इत्यादिकांची परि- गणना होई. ३