पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ भारतीय साम्राज्य. [ भाग आदरपूर्वक त्यांचें त्यांनी स्तवन केल्याची ठिकठिकाणी असंख्य उदाहरणे सांपडतात. ह्मणजे आग्नि हा सीतनिवा- रण करून सर्व प्रकारें सुख देतो, सबब त्याला आणि त्याच्यासारख्या प्रभाव दाखविणाऱ्या भूदेवता. आकाशदेवता. इतर शक्तींस भूदेवता कल्पून, त्यांचा स्तुतिपाठ त्यानीं गाइल्याचे आढळते. मरुत् वं इंद्रादि देवता पर्जन्यवृष्टि करून असंख्य प्राण्यांच्या जीव- नास व सुखात्पत्तीस कारणीभूत होतात, ह्मणून त्यास अंत- रिक्षांतील देवता समजून, त्यांचा- ही त्यांनी अनन्यभावें धांवा केल्याचें दिसून येतें. तसेंच, सूर्य आणि इतर तेजोमय गोल हे पृथ्वीवर सर्वत्र दीप्ति करून प्रकाश पाडतात, गनास आल्हाद देतात सत्रच त्यांजला स्व- देवता मानून, त्यांजविषयींही त्यांनी जागोजाग प्रेमोद्गार काढल्याचें दृग्गोचर होतें. याव- रून, सूक्ष्म व पूर्ण विचारानें मथितार्थ काढला तर, अशी खात्रीपूर्वक कल्पना होते कीं, द्यावा, पृथिवी व आ- काश, या स्थलत्रयांतील शक्तिप्रभावानी जे मनावर संस्कार होऊन त्यापासून अलौकिक चमत्कार वाटले, त्या शक्तिसमुदायासच समयानुसार पृथक् पृथक् देवता कल्पून, आर्यांनी आपल्या मनाचें कसें तरी प्रथमतः सांत्वन केले असावें. त्यानंतर कालवशात्, बाह्य शक्ति- स्वर्देवता.