पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ भारतीय साम्राज्य. [ भाग भद्वैत मत. त्या वेळची पश्चिम सरहद्द जी विशाळ सिंधु नदी, हिचा प्रत्यक्ष प्रभाव ठायीठा दृग्गोचर होतो. याप्रमाणें जिकडे पाहवें तिकडे ईशप्रभावचमत्कृति, त्यांची धर्मरचना व शिवाय तत्कालीन आर्य लोकांस दुसरें प्रत्यक्ष कांहीच भासमान झालें नसल्यामुळे, या दृश्यमान सर्व वस्तूंचें कांहीं तरी अदृश्य व अतर्क्य असे आदिकरण असून, तेच आदिकारण सर्व विश्वाचें चालक आणि नियामक असावें, अशाविषयीं त्यांची बलवत्तर खात्री होत चालली. याबद्दल वेद ऋचा व संहिता प्रमाण आहेत. वेदकालीन आर्य लोक त्या आदिकारणास हिरण्यगर्भ ह्मणत, आणि यच्चयावत् भासमान होणारें विराट स्वरूप त्या आदिकारणाचीच विभूति आहे, असे त यथार्थ मानीत. १ हिरण्यगर्भः समंवर्त ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक आसीत सदांधार पृथिवींयामुतेमाकस्मै देवाय ह विषां विधेम ॥ १ ॥ य आत्मदा बलदा यस्य विश्वं उपासते प्रशिषं यस्य॑ दे॒वाः। यस्य॑छ॒यामृतं॒ यस्य॑ मृ॒त्युः कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ २ ॥ यःप्रणतो नि॑िमिष॒तो महित्वैक इद्राजा जग॑तो पुढे चाल