पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा ] आर्याचे मूलनिवासस्थान, २१ ज्या गोष्टी स्थूल परिमाणाने दृष्टीस पडतात, त्या पाहून अदृश्य ईशशक्ति, तिचें सर्वसाक्षित्व, सर्वव्यापकता, अनंतत्व, नियंतृत्व, आणि व्यवस्था, नैयमिकत्व, हीं प्रत्य- क्षत्र भासमान झाल्या कारणानें, त्यापासून अद्भुत चम- त्कार वाटल्याशिवाय तो कसा राहणार ? उत्तरेच्या बा- जूला नजर फेंकली असतां, हिमाचलाचीं गगनचुंचित शिखरें दृगूगोचर होतात; व त्याच्या इतस्ततः पसर- लेल्या शाखा ईशान्य आणि वायव्य दिशेनें दक्षिणगामी होऊन, प्रशांत व उदार अशा हिंदी महासागराच्या पवित्र उदकाचा स्पर्श होतांच, जणूकाय त्या पूर्व पश्चिम समुद्रांतच अंतर्धान पावल्या असे वाटतें. पूर्वेकडे पाहिलें तर, त्याच अत्युच्च पर्वतापासून निघालेली हैमवती व यमुना, ह्या आपल्या पवित्र जलानें आसमंतांतील सर्व लो- कांस जणूकाय एकदम पूनीत करण्याकरतांच वेगानें धांवत आहेत की काय असे भासतें. दक्षिणेस पहावें तर हिंदी महासागराचा सखोल व प्रचंड असा वारिसमूह नजरेस पडतो. त्याच्या भरती ओहोटीचा नियमित काल, त्याची गंभीर वीचिगर्जना, आणि त्याचें अनुपम ऐश्वर्य, ह्यांचा एकसमयावच्छेदेकरून मनावर परिणाम घडल्या- शिवाय राहतच नाहीं. आतां, क्षणभर पश्चिमेकडे वळले तरी, भीति व विस्मय यांचा पूर्ण ठसा मनावर उमटण्याची सर्व साधनें मूर्तिमंत उभींच आहेत, असा भास होतो. कारण,