पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [भाग .सामर्थ्य भासमान होऊं लागतें. आणि एकादें भांडें कांठो- कांठ भरून अतिरिक्त झाल्यावर जसे वाहू लागतें, किंवा जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो जसा पाट, त्याप्रमाणे, मानवबुद्धि प्रगल्भतेप्रत पावल्यावर तिचा परिणाम कोणत्या तरी मार्गानें बाहेर पडून, तो आपले स्वरूप प्रकट केल्याशिवाय कवींही राहत नाहीं. ही मानवी स्थितिपरंपरा, व अशा प्रकारचा आनुक्र- मिक बुद्धिविकास, या विषयींचा सविस्तर इतिहास मनांत आणिला ह्मणजे, मूळ आर्यांच्या जन्मकालाचे साधारण अनुमान करितां येतें, आणि तें आज सुमारें बारा हजार वर्षीपलीकडील कालांत उदयास आले असावे, असे वाटतें. अनेक भाषाकोविदांच्या मतें जे आर्यलोक हिंदुस्थानांत त्यांचा आनुमानिक काल. १ तारीख ५ सप्टेंबर सन १८९२ रोजी, लंडन शहरांत प्राच्य भाषा- कोविदांची एक मोठी परिषद भरली असून, तींत अध्यक्ष मोक्षमु- करनीं असें बोलून दाखविलें कीं, भाषेच्या इतिहासावरून पाहतां, आर्य लोकांच्या अति प्राचीन अस्तित्वाचा काल ख्रिस्ति शकापूर्वी दहा हजार १०,००० वर्षेपर्यंत पोहोचविण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. आनीबिझांट असें ह्मणते की, आयच्या उत्पत्तीला सुमारें दहा लाख वर्षे होऊन गेलीं, “The Aryan race on the earth is about a million years old. " ( Mrs. Besant on Theosophy and Religion ) 14/3/94,