पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०वा] आयचे मूलनिवासस्थान. इत्यादि पाहून त्यांस अत्यंत कुतूहल व आश्चर्य वाटलें. तदनंतर हीं प्रचंड पंचमहाभूतें, त्यांची अनुपम शक्ति व रौद्ररूपें, इत्यादींचें, तसेच ती ज्यानें निर्माण केली त्या ईशाचें स्तवन करण्याची आमच्या आयीच्या मनांत स्फूर्ति होऊन, त्यांनी आपले प्रेमोद्गार छान्दसवृत्तांत प्रथम गाइडे. आणि हेच ऋग्वेदांत जसेच्या तसेच, व अगदी हुबेहुच दृष्टिगोचर होतात. ही स्तवनस्फूर्ति होण्यापूर्वी, किंवा अशा प्रकारचे उदात्त विचार मनांत येण्याच्या अगोदर, नानाविध गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येऊन अनेक वस्तूंचे गुणधर्म त्यांस अवश्य समजले असले पाहिजेत; समाज व संस्थांची रचना देखील त्यांच्या ध्यानांत पूर्णपणे आली असली पाहिजे; आणि बुद्धिमत्ता, शक्तिमत्ता, व कल्पनासामर्थ्य, इत्या- दिकांचाही पूर्ण विकास झाला असला पाहिजे. आतां, इतकी उन्नतावस्था एकदम कधींही प्राप्त होत नाहीं. ती प्राप्त होण्याला हजारों वर्षे लोटतात. प्रथम वन्या- वस्थेंतून पार पडावें लागतें, आणि त्या स्थितीतच अनेक शतकें घालवावी लागतात. तदनंतर कालगतीनें, अवलोकन करण्याची क्वचित् क्वचित् स्फूर्ति होण्यास प्रारंभ होतो, व पुढें ओघानेंच विचारंतरंग आपाआप उठतात. याप्रमाणे मनुष्याची कल्पनाशक्ति हळू हळू वाढत जाऊन, तिचें त्यांची मानसिक उत्क्रांति.