पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्याचें मूलनिवासस्थान. आले त्यांनी या देशांत, आफगाणि स्थानांतून हिंदुकुश पर्वताच्या बाजूनें खैबर नामक खिंडीतून, आगमन केलें. आतां, आमचे आर्य मूळचे भरत खंडांतील असोत, किंवा ते मध्य एशियांतून येवोत, इतकें मात्र सिद्ध आहे की, त्यांनी आफगाणिस्थानांतील प्राचीन कुभा (ह्मणजे सांप्रतच्या काबूल) नदीवर बराच काळपर्यंत निवास करून, त्या ठिकाणींच प्रथमतः वेदमंत्र गाण्याची सुरुवात केली. कारण, ऋग्वेदांतील कांही ऋचांत सदरहू कुभा नदी, व क्रुम, आणि गोमती, ( सांप्रतच्या कुरुम व गोमल ) याविषयीं उल्लेख केल्याचे आढळते. त्यानंतर क्रमा- क्रमाने प्रचंड सिंधु, अतुद्री किंवा शतदु, जिला हल्लीं सतलज ह्मणतात ती, विपाशा अथवा सांप्रतची ब्यास नदी, ( म्हणजे सतलज नदीचा वायव्येकडील फांटा), परूष्णी (किंवा इरावर्ती, जिला हल्ली रावी असे ह्मणतात ती ), असिनी किंवा चंद्रभागा (हल्लींची चीनाब ), आणि वितस्ता (सांप्रतची जेलम), या नद्यां- विषयींचे उद्गार वेदांतील ऋचांत ठिकठिकाणी सांपडतात, त्यावरून ते आफगाणिस्थान सोडून सिंधुनदी वलांडून पंजावांत आल्याचे दिसते. पुढे कांही कालाने त्यांची वस्ती उत्तरोत्तर पूर्व दिशेकडे पसरत गेल्यानें मध्यदेशांत यमुना व गंगा नदीपर्यंत येऊन ठेपले, थेट १०वा] आर्य लोकांचे क्र माक्रमानें झालेले स्थ- लांतर.