पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ भारतीय साम्राज्य. [ भाग एकंदरींत, त्या काळाच्या आमच्या आर्यलोकांविषयीं आज. मित्तीसही सूक्ष्म विचार केला असता असे दिसून येतें कीं, सुधारलेल्या काळांत हरएक मनुष्यास, हरएक बाबतीत, हर- तऱ्हेचें सुख व्हावे, ह्मणून जे जे उपाय व शोध केले जातात, ते ते सर्व अथवा कांहीं अंशानें तरी, त्या पुराणकालीं, ह्मणजे आज सुमारें सात आठ हजार वर्षीमागे त्यांनी केले होते. त्यावरून त्यांची विशालबुद्धि, त्यांचें दाक्षिण्य, व विशारदत्व, ही सहजींच पूर्णपणे लक्षांत येतात. प्रमाण. ह्या गोष्टीला मूळप्रमाण आमचे वेदच होत. या वेद- वेद हेच आर्याच्या चतुष्टयांत ॠग्वेद हा जगांतील सर्व अति प्राचीन उन्नतीन ग्रंथांत अत्यंत पुराणग्रंथ आहे, असे आह्मा हिंदूंसचसें काय, पण तें अन्य कोणालाही प्रांजलपणे कबूल केले पाहिजे. आशिया, यूरोप, आणि अमेरिका खंडांतील जी राष्ट्रे सुधारणेच्या उच्च कोटीप्रत पोहोचली आहेत, त्यांतील अत्यंत शोधक अशा प्रत्येक विद्वानाचें असेच मत आहे. वेद ह्मणजे सुधारणेच्या बाल्यावस्थेतील आमच्या पूर्व- जांचे अव्याज उद्गार होत. हें वि- वेदांचे उत्पादक स्तीर्ण नभोमंडल व त्यांत चमकणारे चंद्र- सूर्यादि प्रचंड गोल, मेघवृष्टि व त्यामुळे उद्भवलेला अमित जलसंचय, पवनकलोल व विद्युद्धतेचें तीक्ष्ण तेज, ही अवाढव्य पृथ्वी व तिजवरील विलक्षण सृष्टिसौन्दर्य,