पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग परंतु तिचा उत्तरार्ध या कविवराच्या हातूनच पुरा होण्याचा ईश्वरी संकेत नसल्यामुळे, त्याजवर मृत्यूनें आ पली अकालिकच झडप घातली. तथापि, दुःखांत सुख इतकेंच मानावयाचें कीं, झालेली देशहानि भरून काढण्या- साठी, वाणाच्या पुत्रानेच केवळ दीर्घोत्साहानें त्या कामास हातबोट लाविण्याचें मनांत आणून, राहिलेला उत्तरार्ध त- डीस नेला; व ईशकृपेनें त्यांत त्याजला चांगले यशही आलें, असे म्हणण्यास देखील कांही हरकत नाहीं. अर्से सांगतात की, बापाच्या वर्षश्राद्धापूर्वी कादंबरीचा राहिलेला सर्व भाग पुरा करण्याविषयीं या सत्पुत्वाचा पूर्ण संकल्प असून, तो त्यानें सिद्धीसही नेला. • याशिवाय दुसरे गद्यपद्य ग्रंथ म्हटले म्हणजे बृहत् - कथा आणि कथासरित्सागर असे होत. यांपैकी प्रथमची कृति गुणा- ढ्यानें इ० स० च्या सहाव्या शत- कांत केली असून, दुसरी कृति सोमदेवकृत इ० स० च्या बाराव्या शतकांतली आहे. जयदेवकृत गीतगोविंद, भर्तृहरिकृत शृंगारशतक, आणि जगन्नाथरायकृत भामिनी- विलास, हीं संस्कृतांतील प्रसिद्ध कामुक काव्यें होत. जयदेव हा २३० कादंबरीचा पूर्वार्ध व उत्तरार्ध. बृहत्कथा व कथा- सरित्सागर. गीतगोविंद व भा मिनीविलास.