पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] गद्यग्रंथ. २२९ असून रमणीय आहे; आणि सरळ असून मधुर आहे. त्यांतील श्लेष खुबीदार असून सुरेख आहेत; व सुबोध असून मनोहर आहेत; त्यांतील ठिकठिकाणचे हुबेहुब देखावे, विचित्र शोभा, आणि रमणीय स्थलें, हीं इतक्या मार्मिकपणानें वर्णन केली आहेत की, त्यायोगानें संस्कृत भाषा ही जणूकाय त्याच्या घरीं पाणीच भरते आहे की काय अर्से भासून, त्याच्या अचाट कल्पनेचें व बुद्धिवैभवाचें फारच आश्चर्य वाटते. बाणभट्टाचें प्रागल्भ्य, व त्याचें कवि- त्वसामर्थ्य, यांविषयी खाली लिहिलेली आर्या सुप्रसिद्ध आहे. जाता शिखंडिनी प्राक्यथा शिखंडी तथावगच्छामि । प्रागल्भ्यमधिकमवाप्तुं वाणी बाणो बभूवेति ॥ (गोवर्धन. ) ह्याचा भावार्थ इतकाच आहे की, प्राचीन काळीं शिखंडिनी ही ज्याप्रमाणे शिखंडी झाली, त्या प्रमाणेंच वाणी म्हणजे सरस्वती ही आपल्या अंर्गी पुरुषाचा धीट- पणा व प्रागल्भ्य येण्याकरितां, बाणे झाली. एकंदरीत बाणाच्या कृतींतले प्रागल्भ्य व्यक्त करण्याचाच सदरहू कवीचा मुख्य हेतु होय. कादंबरीचा पूर्वार्ध हा खुद्द बाणानेच रचला होता. १ ही कथा भारतांतील उद्योगपर्वाच्या शेवटीं सांगितली आहे. २ बवयों: सावर्ण्यम् असल्यामुळे, गोवर्धनाचार्यांनी हा खुबीदार श्लेष व्यक्त केला आहे. २०