पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] गद्यग्रंथ. २३१ गौड देशाचा राजा जो लक्ष्मणसेन याच्या कारकीर्दीत इ० स० च्या बाराव्या (१११६) शतकांत उदयास आला. भर्तृहरि हा फारच विद्वान् राजा असून तो इ० स० ६५० त मरण पावला. सुप्रसिद्ध नीतिशतक आणि वैराग्य- शतक यांचाही तोच कती होय. कल्पितकथा व उ पाख्याने कल्पितकथा व उपाख्यानांपैकीं सिंहासनद्वात्रिंशिका (सिंहासनबत्तिशी), वेतालपंचविंश- ति (वेताळपंचविशी), विक्रमांकच- रित, शत्रुंजयमाहात्म्य, वीर चरित्र, विक्रमचरित्र, आणि भोजप्रबंध, वगैरे सर्वश्रुत असे पुष्कळ ग्रंथ आहेत. विक्रमांक चरित हैं काश्मीर येथील बिल्हण नामक कवीनें इ० स० १०८५ च्या सुमारास रचले असून, यांत ऐतिहासिक माहिती खऱ्या प्रकारची आढळून येते. यांत चालुक्य नांवाच्या राजघराण्याचाही वृत्तांत आहे. शत्रूंजयमाहात्म्य हे वलभी लिपीत शिलादित्य राजाच्या कारकीर्दीत धनेश्वरानें इ० स० च्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धीत लिहिले असून, वीरचरित्र हें अनंतानें राचलें आहे. कल्पितकथा आणि अद्भुत गोष्टी, यांजला हिंदूंनीं १. Allied to the tables are the Fairy Tales and Romances, in which the luxuriant fancy of the पुढे चालू.