पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ भारतीय साम्राज्य. [ भाग -- आरंभी उदयास येऊन गेला असावा, असे वाटते. ह्याची प्रसिद्ध कृति ह्मटली ह्मणजे वासवदत्ता होय. हींत श्लेष- चमत्कृतीशिवाय दुसरें कांहींच विशेष वर्णन करण्यासारिखें नाहीं. तथापि, श्लेषरचनेत ह्याचा हातखंडा असल्यामुळे, त्याविषयीं बाणकवि अति गौरवानें असें लिहितो की:- कवीनामगलद्द नूनं वासवदत्तया । शक्तयेव पांडुपुत्राणां गतया कर्णगोचरम् ॥ बाण कवि हा वर सांगितल्याप्रमाणें सातव्या शत- काच्या पूर्वार्धांत होऊन गेला. याचें घर शोण नदीच्या पश्चिमेस प्रीति बाण व त्याचा काल. कूट नामक नगरी असून, त्याच्या बापाचें नांव चित्रभानु व आईचें नांव राज्यदेवी होतें. याच्या मुख्य कृति म्हटल्या म्हणजे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ. १ कादंबरी, २ हर्षचरित, ३ चं- डिका शतक, आणि ४ पार्वती परिणय. ह्या सर्वोत कादंबरी ही कृति सर्वमान्य व नामांकित होय. हिच्यां तील संविधानकचातुर्य इतकें कांहीं विलक्षण आणि मनोहर आहे कीं, एकंदर कथेचे बहुतेक पर्यवसान होई पर्यंत पुढे काय होणार तें वाचकांस बिलकुल कळून येत नाहीं. त्यामुळे तत्पारायणतृष्णा एकसारखी वाढत जाते, व तत्संबंधी कुतूहल सतत जागृत राहतें. कादंबरीची भाषा प्रौढ असून चटकदार आहे; उदात्त