पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा ] गद्यग्रंथ. २२७ त्याचे ग्रंथ. कथाभागही कोठें दृष्टीस पडत नाहीं. तथापि, त्याची उत्कृष्ठ गद्यरचना, ह्मणजे दंडीचें जगत्प्रसिद्ध असे जें पद- लालित्य, तेंच त्याच्या अजरामर कीर्तीस कारणीभूत झालें. दंडीच्या दशकुमार चरित्रांत दुसरी एक विशेष महत्वाची गोष्ट आहे ती ही कीं, त्यांत तत्कालीन लोकस्थिति, त्या वेळचे आचारविचार, आणि नीतिविषयाचें प्रसंगानुसार अवलंबन, हीं जशीकांहीं अगदी रेखलेली दृष्टीस पडतात. लबाडास लबाडीनें जिंकणें; स्वार्थासाठी नानाप्रकारचे जारणमारणादि प्रयोग करणे; दुसऱ्यांशी कपट व कृत्रिम आचरणें; असदुपायांचा अंगिकार करणे; आणि द्यूत खेळून अथवा चौर्यादिकमें करून निंद्य मार्गाला जाणे, किंवा लोकांच्या उपहास्यतेस पात्र होणे; इत्यादि गोष्टी त्या काळीं साधारण प्रचारांतल्या असाव्यांत, असें दंडीनें हुबेहूत्र काढिलेल्या चित्रावरून चागले दिसून येतें. या कवीविषयीं एके ठिकाणीं " कविर्दंडी, कविर्देडी, कविर्दंडी, न संशयः " असे ह्मटले आहे. ह्याचाच काव्यादर्श म्हणून दुसरा ग्रंथ आहे. सुबंधु हा बाणाच्या कांहीं पूर्वी, किंवा प्रायः तत्सम कालीन असावा, अशी कल्पना आहे. सुबंध व त्याचा काल. त्यावरून पाहतां तो इसवी सन ६१० - ६५०, अथवा सातव्या शतकाच्या अगदीच