पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ भारतीय साम्राज्य. [ भाग असत; आणि निर्वाहाच्या सोयीसाठी ते ठिकठिकाणीं लांब लांबचे मुक्कामही करीत. मध्यआशियांत माळराने विपुल असल्यामुळे, त्यांच्या गुरांची चरण्याची सोय यथास्थित होत असे, आणि स्वतःचा निर्वाह ते धान्ये पिकवून करीत. त्यांनी बहुतेक ग्राम्य जनावरें पाळलेली असल्याचे दिसतें. त्यांच्या मूळस्थितीविषयीं जी कांही माहिती आपणास उपलब्ध आहे त्यावरून ते रानटी अवस्थेत विलकुल नसून, ते बरेच सुधारलेल्या स्थितीप्रत पोहोंचले होते असे वाटतें. त्यांस बहुतेक धातूंविषैय शोध लागला होता; व लोखंड, तांबें, रुपें, सोनें, वगैरे धातूंचा आणि मोत्यांचा उपयोग करण्याचेही त्यांस माहीत होते. त्यांस पैटनिर्माणक्रिया व शिवणकाम चांगले अवगत असून, ते उत्तम कपडेही वापरीत. त्यांच्यांत तितक्याही पुरातनकाळी नानातऱ्हेचे शिल्पकार, कुशल सुवर्णकार, आणि नित्यनैमित्तिक वगैरे हरेक प्रकारची कामे करण्यासाठी, तांबट, लोहार, सुतार, १ वेदार्थ यत्न. पान १०४-११२-११८-१६८-३२२-३९४. श्लोक ४-२-५-५-५-२. ऋचा १५-५-३५-२२-३१-३०. २ वे. य पान ४१६. श्लोक ४. ऋचा ३५. ३ वे. य. पान ४६. श्लोक १५. ऋचा २३. ४ वे. य. पान ८४. श्लोक ४. ऋचा ५८. (पहा ) " >> "